- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आता, जर तुम्ही स्वतःला यहूदी समजता व नियमशास्त्रावर अवलंबून राहता आणि परमेश्वरामध्ये प्रौढी मिरवता;
तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता;
तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल.
नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.
नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे.
परमेश्वराच्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहीत नाही. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाच्या अधीन न होता, त्यांनी स्वतःचे नीतिमत्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले.
तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.”
ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा.
कारण जर परमेश्वराने स्वाभाविक फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुम्हालाही राखणार नाही.
खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.
“जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”
कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल.
आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो.
परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे.
यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे.
आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते.
मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे.
तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.
म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.