मुख्य मजकुरावर जा

Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले.

  2. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘बाबा, मी इतकी वर्षे सेवा केली आणि तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी तुम्ही आजपर्यंत मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून एक करडूही दिले नाही.

  3. पण आता हा तुमचा पुत्र आपली सर्व संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’

  4. “यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे.

  5. हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”

  6. हे ऐकून परूश्यांनी त्यांचा उपहास केला, कारण ते पैशावर प्रेम करत होते.

  7. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्‍यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्त्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत.

  8. आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला:

  9. “दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार.

  10. परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा नाही.

  11. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’

  12. “परंतु जकातदार दूर उभा राहिला. आपले डोळे वर आकाशाकडे न लावता आपल्या छातीवर मारून म्हणाला, ‘हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर.’

  13. “मी तुम्हाला सांगतो, हा मनुष्य, त्या दुसर्‍यापेक्षा परमेश्वरासमोर नीतिमान ठरून घरी गेला. कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, त्यांना उंच केले जाईल.”

  14. एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”

  15. येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही.

  16. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”

  17. तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.”

  18. जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”

  19. जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.

  20. त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”

  21. त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत!

  22. तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.

  23. मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.”

  24. जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?”

  25. येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”