Skip to content

Self-Righteousness बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे, ज्यात दुष्टाचा डेरा होता?’

  2. जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय? आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—

  3. “मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?

  4. जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?

  5. मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता.

  6. परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.

  7. “तुला असे बोलताना मी ऐकले आहे— हेच शब्द मी ऐकले आहेत—

  8. ‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही; मी स्वच्छ आणि दोषविरहीत आहे.

  9. “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’

  10. जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?

  11. तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर, आणि तुझे न्यायीपण इतर लोकांवर परिणाम करू शकतात.

  12. दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते; तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो. त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो.

  13. तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो.

  14. मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.

  15. एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.

  16. मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.

  17. पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?

  18. माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.

  19. कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.

  20. जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.

  21. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

  22. दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको; बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.

  23. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.

  24. जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.

  25. स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील.