मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे.

  2. परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  3. म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.

  4. “जो कोणी मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल.

  5. त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, ‘प्रभूजी, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’

  6. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’

  7. “यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.

  8. पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.

  9. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे.

  10. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

  11. मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो

  12. माझा आत्मा माझ्या तारणार्‍या परमेश्वरामध्ये आनंद करतो,

  13. कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.

  14. कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्यांचे नाव पवित्र आहे.

  15. त्यांचे भय बाळगणार्‍यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते.

  16. त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.

  17. त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे.

  18. भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे. परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.

  19. त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,

  20. जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”

  21. मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.

  22. नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:

  23. “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.

  24. त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  25. जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—