Skip to content

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

  2. एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते,

  3. तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.

  4. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”

  5. त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.

  6. येशूंनी शब्बाथ दिवशी बरे केले हे पाहून सभागृहाचा प्रमुख खूपच संतप्त झाला व लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत; त्या दिवसातच आजारातून बरे होण्यासाठी येत जा; शब्बाथ दिवशी नाही.”

  7. प्रभूने त्यांना उत्तर दिले, “ढोंग्यांनो! तुमच्यातील कोणी शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून बाहेर पाणी पाजण्यास नेत नाहीत काय?

  8. ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?”

  9. येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले.

  10. एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते.

  11. तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता.

  12. परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?”

  13. परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.

  14. नंतर ते म्हणाले, “जर तुमचे लहान लेकरू किंवा बैल शब्बाथ दिवशी विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही का?”

  15. पण ते काहीच बोलले नाही.

  16. हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले.

  17. नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.

  18. तिथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक मनुष्य होता.

  19. येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”

  20. “प्रभूजी,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.”

  21. तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग.”

  22. त्याच क्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरूण उचलून चालू लागला. ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता.

  23. आणि यहूदी पुढारी त्या बर्‍या झालेल्या मनुष्याला म्हणाले, “शब्बाथ दिवशी अंथरूण उचलणे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

  24. परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, तो म्हणाला, ‘तुझे अंथरूण उचलून चालू लाग.’ ”

  25. त्यांनी त्याला विचारले, “तुझे अंथरूण उचलून चालू लाग, असे सांगणारा व्यक्ती कोण आहे?”