Skip to content

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे.

  2. “ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन.

  3. कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते.

  4. माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  5. “ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन.

  6. कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली.

  7. तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत.

  8. त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले.

  9. “ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.

  10. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे.

  11. शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.

  12. शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.

  13. एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्‍याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे.

  14. मी तिचे सर्व उत्सव: तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन, तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन.

  15. असे म्हणता, “अमावस्या केव्हा निघून जाईल म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” तराजूत लबाडी करून, लबाडीच्या मापाने, किंमत वाढवू.

  16. शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.

  17. जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”

  18. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  19. तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

  20. किंवा, मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय?

  21. मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.

  22. ‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता.

  23. कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

  24. तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?”

  25. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय?