Skip to content

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा.

  2. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी,

  3. परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.

  4. तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.

  5. त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “हा ठीक आहे.”

  6. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.

  7. भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.

  8. “तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या.

  9. तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र शब्बाथाची ओळख करून दिली व तुमचा सेवक मोशेद्वारे त्यांना आज्ञा, नियम व कायदे प्रदान केले.

  10. “शेजारील देशात असणार्‍या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू.

  11. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  12. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत.

  13. मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात?

  14. तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”

  15. यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.

  16. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली.

  17. पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही.

  18. नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा.

  19. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  20. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  21. दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.

  22. हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.

  23. हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!

  24. मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,

  25. दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.