Skip to content

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!

  2. हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

  3. परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.

  4. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला; माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.

  5. नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;

  6. जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.

  7. वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.

  8. ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”

  9. याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.

  10. अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.

  11. जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”

  12. तर याहवेह असे म्हणतात: “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, जे मला आवडणार्‍या गोष्टीच निवडतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  13. त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.

  14. आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  15. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  16. “जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,

  17. तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.

  18. एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्‍या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्‍या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात.

  19. याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका.

  20. शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती.

  21. याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात,

  22. तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील.

  23. परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”

  24. यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.

  25. बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे.