मुख्य मजकुरावर जा

Sabbath बद्दल बायबलमधील वचने: Christian Sabbath, first day of the week, Sunday

17 वचने · 6 पैलू

Christian Sabbath, first day of the week, Sunday बद्दल वचने

  1. शब्बाथ संपल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया कबर पाहावयला गेल्या.

  2. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे.

  3. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.

  4. अकस्मात येशू त्यांना भेटले व “अभिवादन” असे म्हणाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांची उपासना केली.

  5. येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले.

  6. आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले.

  7. परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले.

  8. आणि तिला, जिथे येशूंचे शरीर ठेवले होते तिथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले.

  9. त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.”

  10. असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.

  11. येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”

  12. येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.”

  13. आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  14. एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  15. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्‍या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.

  16. प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत.

  17. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला.