Skip to content

Sabbath बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

217 वचने · 6 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली.

  2. सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.

  3. सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.”

  4. मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”

  5. म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले.

  6. मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही.

  7. सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”

  8. पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही.

  9. मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार?

  10. हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”

  11. म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.

  12. शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.

  13. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी.

  14. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  15. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  16. “सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.

  17. “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.

  18. “ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे.

  19. सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.

  20. इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा.

  21. तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ”

  22. “सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा.

  23. सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे.

  24. शब्बाथ दिवशी तुमच्या कोणत्याही घरामध्ये विस्तव पेटवू नये.”

  25. तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये