Sabbath बद्दल बायबलमधील वचने: Religious usages on
Religious usages on बद्दल वचने
सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.
शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो?
ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.
नंतर येशू खाली गालील प्रांतातील कफर्णहूम येथे गेले आणि शब्बाथ दिवशी लोकांना शिकवू लागले.
दुसर्या एका शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये ते शिक्षण देत असताना, उजवा हात वाळून गेलेला असा एक मनुष्य तिथे उपस्थित होता.
एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते,
ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले.