- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Sabbath बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये
कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.
तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.
“ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे.
याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.
“ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.
“सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.
या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.
जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.
जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन.
कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”
ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे.
“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.
जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल.
अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.
इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला.
तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले,
आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते.
मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.”
मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.
“शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे.
नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.