मुख्य मजकुरावर जा

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला होता हे आम्हास ठाऊक आहे.

  2. तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हे आम्हास माहीत नाही. तो प्रौढ आहे. त्यालाच विचारा.”

  3. त्याचे आईवडील यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे.

  4. यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो प्रौढ आहे; त्याला विचारा.”

  5. तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्‍यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.”

  6. त्यावर तो म्हणाला, “तो पापी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु मला एक गोष्ट माहीत आहे. मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते!”

  7. त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”

  8. तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

  9. त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत!

  10. आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.”

  11. तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे केवढे आश्चर्य आहे! त्याने माझे डोळे उघडले आणि तो मात्र कुठून आला याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही!

  12. आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात.

  13. कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही.

  14. ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.”

  15. तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.

  16. आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्‍या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्‍यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील.

  17. आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले.

  18. परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले.

  19. आणि तिला, जिथे येशूंचे शरीर ठेवले होते तिथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले.

  20. त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.”

  21. असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.

  22. येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”

  23. येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.”

  24. आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  25. एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”