मुख्य मजकुरावर जा

Sabbath बद्दल बायबलमधील वचने

239 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जो मनुष्य बरा झाला होता त्याला आपल्याला कोणी बरे केले, याची कल्पना नव्हती, कारण येशू गर्दीत दिसेनासे झाले होते.

  2. नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

  3. येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

  4. मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता.

  5. मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता?

  6. तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.”

  7. येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले,

  8. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?”

  9. येशूंनी उत्तर दिले, “त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी.

  10. जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही.

  11. मी या जगात आहे, तेव्हापर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे.”

  12. असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला.

  13. “जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.

  14. त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले “बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?”

  15. काहीजण म्हणाले, “होय, हाच तो.” पण इतर म्हणाले, “नाही, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो.” तो भिकारी आग्रहपूर्वक म्हणाला, “मी तोच मनुष्य आहे!”

  16. “मग तुझे डोळे कसे उघडले?” त्यांनी त्याला विचारले.

  17. तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.”

  18. त्यांनी विचारले, “तो मनुष्य कुठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.”

  19. तेव्हा त्यांनी जो मनुष्य आंधळा होता त्याला परूश्यांकडे आणले,

  20. आता येशूंनी चिखल तयार करून त्या माणसाचे डोळे उघडले तो शब्बाथवार होता.

  21. यास्तव परूश्यांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा तो मनुष्य उत्तरला, “त्यांनी माझ्या डोळ्यांवर चिखल लावला आणि मी तो धुऊन टाकला आणि आता मी पाहू शकतो.”

  22. त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली.

  23. शेवटी परूशी पुन्हा आंधळ्या मनुष्याकडे वळले व त्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्यांच्याविषयी तुला काय म्हणावयाचे आहे?” यावर तो मनुष्य उत्तरला, “तो परमेश्वराचा संदेष्टा आहे.”

  24. यहूदी पुढार्‍यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या माणसाच्या आईवडिलांस बोलावून आणेपर्यंत, तो आंधळा होता आणि आता त्याला दिसते, यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

  25. त्यांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता तो हाच आहे का जो आंधळा जन्मला होता? तर मग त्याला आता दृष्टी कशी आली?”