मुख्य मजकुरावर जा

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. विश्वासाद्वारे हाबेलाने काईनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो.

  2. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली;

  3. कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.

  4. परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.

  5. माझ्या बंधू आणि भगिनींनो, जर कोणी असा दावा करतो की त्याच्याजवळ विश्वास आहे, परंतु क्रिया नाही तर त्यापासून काय लाभ? अशा विश्वासाने त्यांचे तारण होऊ शकेल का?

  6. समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे.

  7. जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग?

  8. त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.

  9. पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.” तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.

  10. परमेश्वर एकच आहे असा तुमचा विश्वास आहे. तर उत्तम! दुरात्मे देखील विश्वास धरतात आणि भीतीने थरथर कापतात.

  11. अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का?

  12. आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का?

  13. तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला.

  14. आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,” आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले.

  15. तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.

  16. त्याचप्रमाणे, राहाब वेश्याने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्‍या मार्गाने पाठवून दिले, यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का?

  17. जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.

  18. एकाच झर्‍यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय?

  19. माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्‍या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.

  20. तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे.

  21. परंतु तुम्ही कटुता, मत्सर आणि स्वार्थी इच्छा आपल्या अंतःकरणात बाळगत असाल, तर पोकळ बढाई मारू नका किंवा सत्य नाकारू नका.

  22. अशा प्रकारचे ज्ञान हे स्वर्गातून उतरत नाही, परंतु ते पृथ्वीवरील अनीतिमान व सैतानाकडून आहे.

  23. कारण जिथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तिथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो.

  24. परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.

  25. शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात.