Skip to content

Rain बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 65 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

  2. गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.

  3. गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले.

  4. फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.

  5. मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.

  6. पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले.

  7. “ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल,

  8. तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील.

  9. कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.

  10. परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो.

  11. आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—

  12. तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल.

  13. तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल.

  14. पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.

  15. माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो, माझ्या शब्दांची दवाप्रमाणे पखरण होवो, नव्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, कोवळ्या रोपांवर पावसाच्या सरींप्रमाणे वृष्टी करोत.

  16. हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”

  17. तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.

  18. इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला.

  19. इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्‍यात पसरले.

  20. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”

  21. तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम हे नाव पडले.

  22. पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या.

  23. तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’

  24. “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील,

  25. तेव्हा त्यांची विनंती ऐकून आपले सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा व जो देश आपण आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा.