Skip to content

Rain बद्दल बायबलमधील वचने: Withheld as judgment

7 वचने · 65 पैलू

Withheld as judgment बद्दल वचने

  1. तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल.

  2. पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.

  3. “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील,

  4. “जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन,

  5. यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.

  6. “हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.

  7. आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.