मुख्य मजकुरावर जा

Rain बद्दल बायबलमधील वचने: Frequently withheld on account of iniquity

4 वचने · 65 पैलू

Frequently withheld on account of iniquity बद्दल वचने

  1. तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल.

  2. यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.

  3. तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.

  4. “हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.