Rain बद्दल बायबलमधील वचने: Sent by God
Sent by God बद्दल वचने
आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—
तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल.
हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’ आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.
तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.
ते स्वतःस असे म्हणत नाहीत, ‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू, जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात, जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’
या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.