मुख्य मजकुरावर जा

Rain बद्दल बायबलमधील वचने: The plague of, upon Egypt

7 वचने · 65 पैलू

The plague of, upon Egypt बद्दल वचने

  1. मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.”

  2. जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

  3. गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.

  4. गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले.

  5. फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.

  6. मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.

  7. पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले.