Rain बद्दल बायबलमधील वचने: The latter, before harvest
The latter, before harvest बद्दल वचने
सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.
“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.