मुख्य मजकुरावर जा

Rain बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 65 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.

  2. चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”

  3. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  4. सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.

  5. “हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.

  6. “वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.

  7. आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.

  8. जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात.

  9. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.

  10. पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.

  11. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

  12. ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो.

  13. तरी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष दिली: त्यांच्याच दयेने तुमच्यासाठी आकाशातून पाऊस पाडतात, ऋतूमध्ये पीक देतात; ते तुम्हाला भरपूर अन्न पुरवितात आणि तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतात.”

  14. जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

  15. एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही.

  16. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.