Skip to content

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे.

  2. जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे.

  3. दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील

  4. जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.

  5. “अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्‍या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा.

  6. जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल.

  7. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  8. लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले

  9. आणि मोशेविरुद्ध उठले. त्यांच्याबरोबर समाजाचे सुपरिचित व मंडळीचे नेमलेले पुढारी असे दोनशे पन्नास इस्राएली पुरुष होते.

  10. ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”

  11. जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला.

  12. मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.

  13. तर कोरहा, तू आणि तुझ्या सर्व अनुयायांनी असे करावे: धुपाटणे घ्या

  14. आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”

  15. मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका!

  16. तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय?

  17. त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता.

  18. तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”

  19. मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही!

  20. दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे!

  21. त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”

  22. मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”

  23. पुढे मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तुला अनुसरणाऱ्या सर्वांना घेऊन तू येथे याहवेहसमोर ये. तू आणि ते व अहरोनही त्यावेळी हजर असेल.

  24. प्रत्येकाने असे सर्व मिळून आपआपल्या दोनशे पन्नास धुपाटण्या धुपासह याहवेहसमक्ष घेऊन यावे. अहरोन त्याचे आणि तू तुझे धुपाटणे घेऊन हजर व्हावे.”

  25. याप्रमाणे प्रत्येकाने आपले धुपाटणे घेतले, त्यात जळते निखारे व धूप टाकला आणि ते मोशे आणि अहरोन यांच्याबरोबर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले.