Skip to content

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले.

  2. याहवेह, मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  3. “तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.”

  4. पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्‍यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”

  5. नंतर याहवेह मोशेला म्हणाले,

  6. “कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूपासून सर्व समुदायाला दूर व्हावयाला सांग.”

  7. तेव्हा मोशे दाथान व अबीराम यांच्या तंबूकडे धावत गेला. त्याच्यामागे इस्राएली पुढारीही गेले.

  8. त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.”

  9. मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.

  10. त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल:

  11. जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही.

  12. परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”

  13. त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली

  14. आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.

  15. ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले.

  16. त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले.

  17. नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.

  18. कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या.

  19. याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.

  20. “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.

  21. परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”

  22. याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे.

  23. जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे.

  24. जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे.

  25. हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.