मुख्य मजकुरावर जा

Precious Stones बद्दल बायबलमधील वचने

64 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन.

  2. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे.

  3. त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले.

  4. जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल.

  5. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  6. आणि जो तिथे बसला होता तो हिर्‍यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते;

  7. त्या दृष्टान्तात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नीसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची ऊरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सर्व निघत होते,

  8. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.

  9. सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड,

  10. ते आक्रोश करून म्हणतील: “ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी! जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या, सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी!

  11. ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती.

  12. तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा,

  13. पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता.

  14. बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा विशाल राजमार्ग काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता.