Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Brought from Sheba
Brought from Sheba बद्दल वचने
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली.
मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.
“ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.