Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  2. कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.

  3. पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?

  4. इजिप्तच्या लोकांनी असे का म्हणावे की, याहवेहने त्यांना डोंगरात मारून टाकावे व या पृथ्वीतून नाहीसे करावे अशा दुष्ट हेतूने बाहेर काढले? आपल्या तीव्र कोपापासून माघार घ्या; सौम्य व्हा आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणू नका.

  5. आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्‍यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ”

  6. परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.”

  7. जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.”

  8. यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.”

  9. तेव्हा मोशेने विनंती केली, “आता मला तुमचे गौरव दाखवा.”

  10. आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”

  11. याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.”

  12. जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे,

  13. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  14. याहवेह मोशेला म्हणाले,

  15. “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

  16. त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा.

  17. मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे.

  18. आणि ते त्या देशात राहणार्‍यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता.

  19. जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील,

  20. ‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’

  21. “आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो:

  22. ‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’

  23. मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”

  24. पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्‍यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”

  25. तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”