Skip to content

Paul बद्दल बायबलमधील वचने

619 वचने · 103 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.

  2. पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते.

  3. लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते.

  4. त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते.

  5. गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले.

  6. म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली.

  7. त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.

  8. मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही.

  9. म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले.

  10. रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.”

  11. पौलाने हा दृष्टान्त पाहिल्यानंतर आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलाविले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली.

  12. आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस येथे गेलो.

  13. तिथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्त्वाचे नगर होते तिथे गेलो. तिथे आम्ही बरेच दिवस राहिलो.

  14. मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.

  15. त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.

  16. मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.

  17. एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे.

  18. ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.”

  19. असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला.

  20. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.

  21. त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत

  22. आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”

  23. मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला.

  24. त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला.

  25. असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.