Skip to content

Obedience बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्या मुखातून निघालेले नियम, चांदी आणि सोने यांच्या हजारो नाण्यांपेक्षाही अधिक मोलाचे आहेत.

  2. मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो कारण तुमचे नियम माझा आनंद आहेत.

  3. त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते; तरी तुमचे नियम मी नाकारले नाही.

  4. अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो.

  5. मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.

  6. दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन.

  7. मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे.

  8. तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो.

  9. तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.

  10. मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन.

  11. जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही.

  12. शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे.

  13. तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो.

  14. याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो.

  15. मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत.

  16. मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे.

  17. तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.

  18. परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”

  19. जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात.

  20. सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.

  21. जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल;

  22. पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.

  23. “तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल.

  24. आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले;

  25. गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.