Skip to content

Obedience बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”

  2. आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे,

  3. परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  4. मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”

  5. याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.

  6. परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील.

  7. परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  8. यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.

  9. जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले,

  10. परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले,

  11. म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’

  12. “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे!

  13. मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे.

  14. म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.”

  15. तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.

  16. म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले.

  17. आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे.

  18. लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.”

  19. आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.”

  20. तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.

  21. जर ते केवळ माझा सेवक मोशेने दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांचे पाय भटकू देणार नाही.”

  22. मग मी म्हणालो: “हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता,

  23. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  24. परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.

  25. जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात, त्यांच्यासाठी त्यांचे सर्व मार्ग प्रीतीचे आणि विश्वासयोग्य आहेत.