Skip to content

Obedience बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.

  2. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.

  3. जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.

  4. अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.

  5. अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.

  6. याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय; त्यांच्या नियमाचे पालन करणार्‍यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते. याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.

  7. याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.

  8. जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत.

  9. तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, म्हणूनच ते तुम्ही योजलेले आहेत.

  10. अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते!

  11. मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही.

  12. मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका.

  13. तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे; त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका.

  14. मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.

  15. मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो; मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही.

  16. त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.

  17. विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे; तुमच्या नियमांवर मी आपले हृदय केंद्रित केले आहे.

  18. याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो, मला लज्जित होऊ देऊ नका.

  19. हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे.

  20. मी सदासर्वकाळ, तुमच्या नियमांचे सतत पालन करेन.

  21. मी स्वातंत्र्याचे जीवन व्यतीत करतो, कारण मी तुमचे नियम आत्मसात केले आहेत.

  22. हे याहवेह, मी रात्रीही तुमचे नामस्मरण करतो, जेणेकरून तुमच्या आज्ञा मी सतत पाळीन.

  23. तुमच्या आज्ञांचे पालन करणे: माझा परिपाठ झाला आहे.

  24. माझ्या मार्गासंबंधी मी विचार केला, आणि तुमच्या नियमाचे पालन करण्याकडे माझी पावले वळविली आहेत.

  25. मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.