Skip to content

Obedience बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.

  2. म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल, तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्यागोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल.

  3. मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”

  4. जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही.

  5. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.

  6. “जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.

  7. येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.

  8. परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच मी तंतोतंत करतो. “आता उठा; आपण येथून जाऊ.”

  9. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल.

  10. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात.

  11. तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली. ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे.

  12. परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहेः तुमचे ऐकावे की त्यांचे? याचा न्याय तुम्हीच करा!

  13. परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे.

  14. परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.

  15. कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.

  16. यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या.

  17. मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”

  18. जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्‍या एवढाच दोषी आहे.

  19. ज्यांनी म्हटले, “तू व्यभिचार करू नको,” तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.” जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो.

  20. स्वतंत्रता देणार्‍या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा,

  21. जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:

  22. आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका.

  23. आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे.

  24. जो कोणी असे म्हणतो, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तीमध्ये नाही.

  25. परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्याची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत.