Skip to content

Levites बद्दल बायबलमधील वचने

186 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत.

  2. परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते.

  3. हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले.

  4. दावीदाने व अधिकार्‍यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.

  5. या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.

  6. या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”

  7. लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.

  8. गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.

  9. लेवी: यांचे वंशज: येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74.

  10. संगीतकार: आसाफचे वंशज 148.

  11. मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे, शोबाईचे, एकूण 138.

  12. मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,

  13. केरोसचे, सीयाचे, पादोनचे,

  14. लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे,

  15. हानानचे, गिद्देलचे, गहरचे,

  16. रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे,

  17. गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे,

  18. बेसाईचे, मऊनीमचे, नफूसीमचे,

  19. बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,

  20. बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,

  21. बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,

  22. नसीयाहचे व हतीफाचे.

  23. शलोमोनच्या सेवकांचे वंशज: पोकेरेथ-हस्सबाईम व आमोन. यांचे वंशज: सोताईचे, सोफेरेथचे, पेरीदाचे,

  24. यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,

  25. शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे, आमोनचे,