Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, तो मीच आहे.”

  2. त्या संदेष्ट्याने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.”

  3. परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत.

  4. याहवेहच्या वचनाद्वारे मला सांगितले गेले: ‘तू तिथे भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये किंवा ज्या मार्गाने तू आलास, त्याने परत जाऊ नये.’ ”

  5. त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)

  6. म्हणून परमेश्वराचा मनुष्य त्याच्याबरोबर माघारी गेला व त्याच्या घरी खाणेपिणे केले.

  7. ते मेजावर जेवायला बसले असताना, याहवेहचे वचन त्या वृद्ध संदेष्ट्याकडे आले, ज्याने त्याला माघारी आणले होते.

  8. तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही.

  9. माघारी येऊन, ज्या ठिकाणी तू भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये असे याहवेहने तुला सांगितले होते, तिथे तू खाणेपिणे केले. म्हणून तुझ्या पूर्वजांच्या कबरेत तुझे शरीर पुरले जाणार नाही.’ ”

  10. परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले.

  11. त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्‍या बाजूला गाढव उभे राहिले.

  12. शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला.

  13. कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले.

  14. अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”

  15. त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती.

  16. शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही.

  17. तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” त्याने ते भांड्यात टाकले आणि म्हणाला, “हे लोकांना खाण्यास वाढा.” आणि भांड्यात काहीही अपायकारक राहिले नाही.

  18. त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.

  19. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.

  20. एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.

  21. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  22. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  23. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  24. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  25. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,