Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  2. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  3. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.

  4. याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.

  5. त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत.

  6. ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.

  7. “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात.

  8. मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले.

  9. म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”

  10. यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला.

  11. मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’

  12. पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही.

  13. यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.

  14. याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.

  15. त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;

  16. निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.

  17. त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.

  18. विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.

  19. जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.

  20. त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.

  21. जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.

  22. मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.

  23. दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे

  24. त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.

  25. त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.