Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.

  2. त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला.

  3. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला.

  4. एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला,

  5. एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते.

  6. त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

  7. ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  8. जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले होते.

  9. त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली.

  10. तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.

  11. त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

  12. ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  13. याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.

  14. याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”

  15. त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.”

  16. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  17. आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.

  18. तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.

  19. राजा त्या परमेश्वराच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर भोजन करण्यास घरी चल आणि मी तुला एक भेट देईन.”

  20. परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार.

  21. कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ”

  22. म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्‍या मार्गाने रवाना झाला.

  23. तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले.

  24. त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला.

  25. तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला.” आणि त्यांनी तसे केल्यानंतर तो गाढवावर बसला