Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!”

  2. जो प्रवास तुम्ही कधीही करणार नाही असे याहवेह म्हणाले होते, तोच प्रवास याहवेह तुम्हाला करावयाला लावतील आणि जहाजातून मी तुम्हाला पुन्हा इजिप्त देशामध्ये पाठवेन. मग तिथे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला पुरुष व स्त्री गुलाम म्हणून विकत घ्यावे यासाठी तुम्ही स्वतःला देऊ कराल, परंतु तुम्हाला कोणाही विकत घेणार नाही.

  3. मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या,

  4. आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,

  5. तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील.

  6. हे याहवेहने बघितले आणि त्यांनी त्यांना नाकारले कारण त्यांच्या पुत्र व कन्यांच्या द्वारे ते संतप्त झाले.

  7. तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन, आणि मग त्यांचा कसा अंत होतो ते पाहीन; कारण ही विकृत पिढी आहे, जी विश्वासयोग्य संतती नाही.

  8. जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे आणि त्यांच्या तुच्छ मूर्तींनी मला संताप आणला आहे. जे लोक नाहीत त्यांच्याद्वारे मी त्यांना ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी त्यांना क्रोधास आणेन;

  9. कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे, तो थेट अधोलोकापर्यंत खोलवर पेटणार आहे. तो पृथ्वी व तिच्यावरील सर्व पिके जाळून टाकील, आणि तिच्या पर्वतांच्या पायांना अग्नी लावील.

  10. “मी त्यांच्यावर संकटांची रास रचेन, माझ्या बाणांनी त्यांच्यावर प्रहार करेन.

  11. मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील, महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील; आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन, मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.

  12. घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील.

  13. मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,

  14. पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली, ते कदाचित गैरसमज करतील, आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे; याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”

  15. ते एक असमंजस राष्ट्र आहे, त्यांच्यात काही विवेक नाही.

  16. हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते, आणि त्यांचा अंत कसा होणार हे त्यांना समजले असते!

  17. हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा, किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात, जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते, जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?

  18. कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही, आमचे शत्रू देखील हे मान्य करतात.

  19. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते, आणि गमोराच्या मळ्यातून येते. त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत, आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.

  20. त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.

  21. “यांना मी राखून ठेवलेले नाही काय, आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय?

  22. सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन. ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील; त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे, आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”

  23. याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील, आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल, आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.

  24. मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?

  25. ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत? त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे! त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!