Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.

  2. मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,

  3. जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.

  4. वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने, शत्रूंच्या सरदारांच्या मस्तकाच्या रक्ताने मी माझे बाण मदमस्त करेन, आणि माझी तलवार मांस गिळून टाकेल.”

  5. अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा, कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील; आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील, आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.

  6. परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

  7. याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.

  8. त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती.

  9. अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना,

  10. एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.

  11. त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.

  12. जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले.

  13. अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली.

  14. शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.

  15. परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

  16. माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.

  17. माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’

  18. “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’

  19. अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही,

  20. आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.

  21. तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.

  22. “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील.

  23. मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.

  24. नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”

  25. तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले.