Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले

  2. शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले.

  3. तो म्हणाला: “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.

  4. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.

  5. त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.

  6. कूशी लोक आणि लिबियाचे लोक हे मोठ्या संख्येने रथ आणि घोडेस्वार असलेले बलाढ्य सैन्य नव्हते का? तरीसुद्धा जेव्हा तुम्ही याहवेहवर भरवसा ठेवला, तेव्हा त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले.

  7. कारण ज्यांची अंतःकरणे याहवेह यांच्याबरोबर पूर्णपणे वचनबद्ध आहेत, त्यांना बळ देण्यासाठी त्यांची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर व्याप्त आहे. तुम्ही मूर्खपणा केला आहे आणि आतापासून तुम्ही युद्धात असाल.”

  8. यामुळे आसा संदेष्ट्यावर रागावला; तो इतका संतापला की त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याचवेळेस आसाने काही लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले.

  9. “याहवेह तुम्हीच परमेश्वर आहात, ज्यांनी अब्रामाला निवडले आणि त्याला खाल्डियनांच्या ऊर शहरातून बाहेर काढून अब्राहाम असे नाव दिले.

  10. त्याचे अंतःकरण तुमच्याशी विश्वासू आहे हे तुम्ही बघितले, म्हणून त्याच्या वंशजांना कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशीचा देश देण्याचा तुम्ही त्याच्याशी करार केला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे केले, कारण तुम्ही विश्वासयोग्य आहात.

  11. “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!

  12. “त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.

  13. अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.

  14. पण तुमच्या महान दयेमुळे तुम्ही त्यांचा सर्वनाश केला नाही व त्यांचा त्याग केला नाही, कारण तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात.

  15. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  16. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  17. ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.

  18. नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.

  19. धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,

  20. ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.

  21. दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो; आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात.

  22. परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.

  23. म्हणून दीन लोकांस आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करेल.

  24. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  25. कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.