Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.”

  2. या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.

  3. आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती.

  4. ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.

  5. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.

  6. आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या.

  7. म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”

  8. आणि पृथ्वीवर पुन्हा जलप्रलय येणार नाही आणि सर्व प्राणिमात्रांचा नाश होणार नाही, तुमच्याशी आणि प्रत्येक प्राण्याशी केलेल्या या कराराची मला आठवण होईल.

  9. जेव्हा मी ते धनुष्य मेघांमध्ये पाहीन, तेव्हा परमेश्वर आणि पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राशी केलेल्या सार्वकालिक कराराची मला आठवण होईल.”

  10. ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.

  11. आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.

  12. ‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे.

  13. आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे,

  14. तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”

  15. मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.

  16. त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”

  17. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.

  18. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.

  19. माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले

  20. आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.”

  21. त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.

  22. परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ”

  23. तुम्ही संख्येने अधिक होता म्हणून याहवेहने तुमची निवड केली नाही व तुमच्यावर प्रीती केली नाही, कारण तुम्ही तर सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अतिशय अल्प होता.

  24. पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.

  25. म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात.