Skip to content

Despondency बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही, गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात,

  2. जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, आणि उल्हास पावतात.

  3. ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे?

  4. उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे; माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे.

  5. ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे; जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे.

  6. मला शांती नाही, स्वस्थता नाही; मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.”

  7. ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल,

  8. जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन,

  9. तर मग माझी आशा कुठे आहे— आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?

  10. ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?”

  11. “प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय? ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?

  12. त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय?

  13. परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला

  14. याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.

  15. त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;

  16. निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.

  17. त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.

  18. विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.

  19. जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.

  20. त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.

  21. जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.

  22. मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.

  23. दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे

  24. त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.

  25. त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.