मुख्य मजकुरावर जा

Despondency बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे.

  2. मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात.

  3. प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे.

  4. त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.

  5. माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.

  6. म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”

  7. माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.

  8. ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.

  9. तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे:

  10. तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली.

  11. तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.

  12. मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून दूर करण्यात आले आहे; तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे दृष्टी लावेन.’

  13. काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.

  14. पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात.

  15. वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.

  16. त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.

  17. शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर.

  18. कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात.

  19. मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.

  20. “त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्‍यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’

  21. “अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल.

  22. कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ”

  23. त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’

  24. एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.

  25. तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.