- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Children बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”
मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी असे ठेवण्यात आले.
ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.
परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला.
तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”
नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला.
तिने त्याचे नाव जबुलून असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”
तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले.
ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”
तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”
“मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला.
त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही.
जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’
नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.
“एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; तुमचा पिता इस्राएल याचे ऐका.
“रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.
तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.
“शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.
मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.
त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.
“हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.
यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?
यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.
तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.
त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.