Children बद्दल बायबलमधील वचने: Share benefits of covenant privileges guaranteed to parents
Share benefits of covenant privileges guaranteed to parents बद्दल वचने
तुझ्या व तुझ्या येणार्या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन.
ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.”
या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.
मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील.
कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.”
त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.
परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ”