Children बद्दल बायबलमधील वचने: Involved in guilt of parents
Involved in guilt of parents बद्दल वचने
तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.
“ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,
ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,
तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.
तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.
भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.
“पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”
Your iniquities, and the iniquities of your fathers together, saith the LORD, which have burned incense upon the mountains, and blasphemed me upon the hills: therefore will I measure their former work into their bosom.