मुख्य मजकुरावर जा

Children बद्दल बायबलमधील वचने: Resignation manifested at loss of

9 वचने · 102 पैलू

Resignation manifested at loss of बद्दल वचने

  1. सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”

  2. आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.

  3. तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.

  4. त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”

  5. त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’

  6. परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”

  7. वाळवंटातून अचानक प्रचंड वारा आला आणि त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्यांच्यावर कोसळले आणि ते मरण पावले; हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!”

  8. हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली

  9. आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”