मुख्य मजकुरावर जा

Children बद्दल बायबलमधील वचने: Inherited property in default of sons

14 वचने · 102 पैलू

Inherited property in default of sons बद्दल वचने

  1. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या

  2. आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या,

  3. “आमचे पिता रानात मरण पावले. ते कोरहाच्या अनुयायांपैकी नव्हते, ज्यांनी एकत्र येऊन याहवेहविरुद्ध बंड केले, परंतु ते आपल्याच पापामुळे मरण पावले आणि त्यांना पुत्र नव्हते.

  4. त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.”

  5. तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला,

  6. आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  7. “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.

  8. “इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.

  9. योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते.

  10. हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.

  11. मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.

  12. त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले.

  13. यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले,

  14. कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता.