Skip to content

Children बद्दल बायबलमधील वचने

257 वचने · 102 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली.

  2. तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”

  3. “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले.

  4. फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.

  5. पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे असे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”

  6. “जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात त्यांना जिवे मारावे.

  7. “जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो.

  8. “जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.

  9. “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

  10. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  11. मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

  12. याहवेह मोशेला म्हणाले,

  13. “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी.

  14. आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी.

  15. नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये.

  16. जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.”

  17. हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे.

  18. याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्‍या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे.

  19. जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.

  20. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.

  21. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  22. ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,

  23. तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

  24. त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.

  25. परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ”