मुख्य मजकुरावर जा

Beneficence बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत.

  2. मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन.

  3. आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

  4. अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली.

  5. त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.

  6. प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.

  7. आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.

  8. म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.

  9. तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.

  10. याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे.

  11. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

  12. या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता.

  13. मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा.

  14. जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.

  15. आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते.

  16. या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे.

  17. याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”

  18. प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही.

  19. कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.

  20. या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे.

  21. मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल.

  22. म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्‍यासारखी ती नसेल.

  23. परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल.

  24. आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो.

  25. परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.