मुख्य मजकुरावर जा

Beneficence बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.”

  2. कारण तो पेरणार्‍यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.

  3. होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.

  4. म्हणजे तुमच्या या सेवेमुळे केवळ प्रभूंच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास साहाय्य होते असे नाही तर परमेश्वराप्रती उपकारस्तुती ओसंडून वाहू लागते.

  5. तुम्ही करीत असलेले सेवाकार्य यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे की, तुम्ही ख्रिस्ताच्या शुभवार्तेला कबूल करून आज्ञाधारक राहिला, तसेच तुम्ही त्यांच्या व सर्वांच्याप्रती उदारता दाखविली म्हणून इतरजण परमेश्वराची स्तुती करतील,

  6. आणि परमेश्वराची अद्भुत कृपा तुमच्यावर प्रकट झाली म्हणून त्यांची मने तुम्हाकडे लागली आहेत व ते तुमच्यासाठी उत्कंठेने प्रार्थना करतात.

  7. परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो.

  8. मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.

  9. मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे.

  10. मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे.

  11. जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.

  12. तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले.

  13. फिलिप्पैकरांनो, तुम्हाला हे माहीत आहे की, शुभवार्तेच्या प्रारंभीच्या दिवसात मी मासेदोनियामधून गेलो, तेव्हा देण्याघेण्यामध्ये केवळ तुमच्याशिवाय कोणत्याच मंडळीने माझ्याशी भागीदारी केली नाही.

  14. मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली.

  15. मला तुमची देणगी पाहिजे असे नाही, तर तुमच्या हिशेबी मोबदला वाढावा किंवा तुम्हाला लाभ व्हावा अशी मी अपेक्षा करतो.

  16. मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत.

  17. समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे.

  18. जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग?